एकीकडे भारतीय संघ सध्या इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत असताना दुसरीकडे रणजी ट्रॉफीही भारतात खेळली जात आहे. रणजी ट्रॉफीमध्ये युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे. मात्र याच दरम्यान बंगालचे क्रीडा मंत्री आणि स्टार क्रिकेटर मनोज तिवारीने (Former India cricketer and current Bengal captain, Manoj Tiwary) एक मोठं वक्तव्य करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे (Why does Manjoy Tiwary think the Ranji Trophy should be scrapped?).
रणजी ट्रॉफी ही भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यात दरवर्षी हजारो खेळाडू सहभागी होतात. परंतु या स्पर्धेची चमक हरवत चाललेली पाहून तो खूप नाराज आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा बंद व्हावी असे त्याने सांगितले. मनोज तिवारीने गेल्या महिन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पा ओलांडला. आणि आता त्याने आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना फक्त ईडन गार्डन्सवर खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात याच मैदानातून झाली असून त्याला याच मैदानावरुन आपली कारकीर्द संपवायची आहे.
पण, त्याला रणजी ट्रॉफीची खूप काळजी आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, पुढील सीझनपासून रणजी ट्रॉफी कॅलेंडरमधून काढून टाकली पाहिजे. या स्पर्धेत अनेक चुका होत आहेत. एवढी मोठी स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. या स्पर्धेचे आकर्षण आणि महत्त्व कमी होत आहे. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटते.
मनोज तिवारी हा सध्या बंगालचा क्रीडा मंत्री आहे आणि तो त्यांच्या देशांतर्गत संघाचे नेतृत्वही करत आहेत. आतापर्यंत त्याने 146 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 10124 धावा केल्या आहेत, ही खरोखरच एक मोठी उपलब्धी आहे. या कालावधीत त्याने 30 शतके आणि 45 अर्धशतकेही केली आहेत. याशिवाय त्याने 169 सामन्यांमध्ये 5581 धावा आणि 183 टी-20 मध्ये 3436 धावा केल्या आहेत.
Minister Manoj Tiwari on Ranji Trophy
Minister Manoj Tiwari on Ranji Trophy
Minister Manoj Tiwari on Ranji Trophy
Minister Manoj Tiwari on Ranji Trophy
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements