बेळगाव : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात यंदाही महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर या आंदोलनावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक होणार आहे.
कर्नाटक सरकारने २००६ पासून बेळगाव येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेऊन कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखविली जाते. यंदा ९ डिसेंबरपासून सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार अशी शंकाही उपस्थित केली जात होती. मात्र, आता अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे आता मराठी भाषिकांच्या मेळाव्याची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि जागृती करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर बैठक घेतली जाणार आहे.
गेल्या १ नोव्हेंबर काळा दिनाच्या कार्यक्रमात देखील युवकांनी उत्साही सहभाग दर्शवला होता. त्याचप्रमाणे महामेळाव्याबाबतही युवकांकडून जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती समितीच्या बैठकीतच पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार आहे.
mes mahamelava belgaum assembly
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310