भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India (BCCI)) भारतीय खेळाडूवर मोठी कारवाई केली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेवर टीका करणाऱ्या खेळाडूला बीसीसीआयने इंगा दाखवत दंडात्मक कारवाई केली आहे. निवृत्तीच्या 24 तासानंतर बीसीसीआयने मनोज तिवारी याच्यावर रणजी ट्रॉफीवरुन टीका ही कारवाई केली आहे. मनोजला (Manoj Tiwary : Minister of State for Youth Services and Sports of West Bengal) एका सामन्यातील मानधनाच्या 20 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे (Manoj Tiwary slapped with fine over viral ‘Ranji Trophy should be scrapped’ rant).
रणजी ट्रॉफी स्पर्धेत चुकीचं घडलंय. आगामी वर्षात या स्पर्धेचा समावेश करायला नको, अशी पोस्ट तिवारीने केली होती. बीसीसीआयने त्यावरुन ही कारवाई केली. पुढील हंगमापासून रणजी ट्रॉफी स्पर्धा हटवायला हवी. स्पर्धेत अनेक चुकीचे प्रकार घडत आहेत. या बहुप्रतिष्ठेत स्पर्धेचा बचाव करण्यासाठी अनेक बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. रणजी ट्रॉफीचं महत्त्व यामुळे कमी होत चाललं आहे. मी फार निराश आहे, असं मनोजने आपल्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटलं होतं.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय खेळाडूंना आवाहन केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आपली कामगिरी सिद्ध करावी लागेल. ईशान किशनमुळे हा फतवा काढण्यात आला. ईशान किशन फिट असूनही तो सध्या ना टीम इंडियासाठी खेळतोय ना आपल्या राज्याच्या टीमसाठी. त्यामुळे बीसीसीआयने ही आक्रमक भूमिका घेतली.
मला वाटतं मी जर ट्विटरवर पोस्ट केली नसती तर बीसीसीसआयने हे आदेश दिले नसते. कदाचित माझ्या पोस्टमुळे बीसीसीआय सचिवांना हे पाऊल उचलावं लागलं. त्यांनी ही भूमिका घेऊन यातून त्यांची क्रिकेटप्रती असलेली चिंता दाखवते. अनेक खेळाडू जे फर्स्ट क्लास क्रिकेटसह आयपीएलमध्ये यशस्वी झाले, ते रणजी ट्रॉफीला महत्त्व देत नसल्याचं जय शाह यांच्या आवहनातून स्पष्ट होतं, असं तिवारी कोलकातामध्ये एका कार्यक्रमात म्हणाला.
युवा खेळाडूंनी आयपीएल केंद्रीत मानसिकता स्वीकारली आहे. जे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत ते रिकाम्या वेळेत दुबई किंवा इतर ठिकाणी जातात. यामुळे प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी स्पर्धेचं महत्त्व कमी होत आहे. आयपीएल आपल्या सर्वांसाठी मोठं व्यासपीठ आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिव यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेचं महत्त्व वाढवावं, असं आवाहनही मी करतो, असंही मनोज तिवारीने म्हटलं.
Manoj Tiwary slapped with fine over viral Ranji Trophy
Manoj Tiwary slapped with fine over viral Ranji Trophy
Manoj Tiwary slapped with fine over viral Ranji Trophy
Manoj Tiwary slapped with fine over viral Ranji Trophy
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements