कोणते संकेत आणि चर्चा नेमकी कशामुळे?
Loksabha Election : देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. माहितीनुसार मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांनी आपल्या निवडणुकीच्या तयारी सुरू केलीय. भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र सत्र सुरू झालंय.
त्यातच 31 जानेवारीपर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या पूर्ण करण्याच्या सुचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवलंय. यामुळे देशात मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी 31 जानेवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मार्च महिन्याच्या आधीच निवडणुका जाहीर होतात का? या संदर्भात चर्चा सुरू आहे.
निवडणुका लवकर लागणार असल्याने भाजपसह काँग्रेस आणि इतर पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बैठकांचा धडका लावलाय. देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आलीय. निवडणुकांच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग राज्यांच्या दौऱ्याना प्रारंभ केलाय. आयोग सर्व प्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगितलं जातंय. माहितीनुसार, यावेळी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
Loksabha Election
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements