Life Insurance Corporation of India (LIC)
LIC चे शेअर्स BSE वर 5.90 टक्क्यांनी वाढले
LIC share price : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी Life Insurance Corporation of India (LIC) च्या शेअर्सने सोमवारी प्रथमच ₹ 1000 रुपयांचा टप्पा ओलांडला आणि कंपनीच्या मूल्यांकनात ₹ 35000 कोटी रुपयांचा नफा झाला. शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 6 टक्क्यांची वाढ दिसून आली. कंपनीचा IPO 4 मे 2022 रोजी आला आणि कंपनीची सूची 17 मे 2022 रोजी झाली. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स 1000 रुपयांच्या पुढे गेले नव्हते.
कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे बाजार मूल्यांकन 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
LIC चे शेअर्स BSE वर 5.90 टक्क्यांनी वाढून 1000.35 रुपयांवर बंद झाले. व्यापारादरम्यान एका क्षणी, तो 8.81 टक्क्यांनी वाढून 1027.95 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. NSE वर त्याचे शेअर्स 5.64 टक्क्यांनी वाढून 998.85 रुपये झाले. ट्रेडिंग दरम्यान, तो 8.73 टक्क्यांनी वाढून 1028 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. 29 मार्च 2023 रोजी कंपनीचा 52 आठवड्यांचा नीचांक होता. तेव्हापासून, म्हणजे सुमारे 10 महिन्यांत, कंपनीच्या शेअर्समध्ये 94 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील वाढीदरम्यान, एलआयसीचे बाजार भांडवल 35,230.25 कोटी रुपयांनी वाढून 6,32,721.15 कोटी रुपये झाले. या वर्षात आतापर्यंत एलआयसीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात, बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला मागे टाकून LIC देशातील सर्वात मौल्यवान सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली. 19,46,521.81 कोटी रुपयांच्या बाजार मूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
LIC कधी सूचीबद्ध झाले? : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. त्यावेळी सरकारने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे LIC मधील 22.13 कोटी पेक्षा जास्त शेअर्स किंवा 3.5 टक्के शेअर्स विकले होते. सरकारकडे कंपनीत अजूनही 96.5 टक्के हिस्सा आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा या कंपनीचा IPO आला तेव्हा हा देशातील सर्वात मोठा IPO होता, आजही तो एक विक्रम आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसी (LIC) एचडीएफसी बँकेतील (HDFC) आपला हिस्सा वाढवत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एलआयसीला खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेतील आपला हिस्सा वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळं एलआयसी आता एचडीएफसी बँकेतील 9.99 टक्के भागभांडवल खरेदी करु शकणार आहे. यासंबंधी एलआयसीने काही काळापूर्वी RBI कडे अर्ज केला होता. त्याला आता परवानगी मिळाली आहे. सध्या एचडीएफसी बँकेत एलआयसीचा हिस्सा हा 5.19 टक्के आहे.
LIC share price breach ₹1000 mark
LIC share price breach ₹1000 mark
LIC share price breach ₹1000 mark
LIC share price breach ₹1000 mark
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements