आमदार लक्ष्मण सवदी @विधानसौध
बेळगाव—belgavkar—belgaum : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद प्रलंबित आहे. तरीही याच मुद्द्यावरून वारंवार चिथावणीखोर विधान केली जात आहेत. महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. दरम्यान, बेळगाव सीमाभागाचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत केली.
सीमावाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात गेलं होतं. त्यावेळी अमित शाह यांनी कर्नाटकातील (मुख्यमंत्री) बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे (मुख्यमंत्री) एकनाथ शिंदे यांना दिल्लीत बोलावून त्यांना या मुद्द्यावर काहीही न बोलण्याची तंबी दिली होती. मात्र, त्यानंतरही कर्नाटकातील नेत्यांच्या कुरापती सुरूच आहेत. आता तर बेळगावातील एका आमदाराने थेट मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे. मुंबई हा सीमाभाग कर्नाटकाचाच भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापणार आहे.
उत्तर कर्नाटक विकास विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार सवदी म्हणाले, बेळगाव सीमाभागातील लोकप्रतिनिधींनी त्याकाळी मुंबई विधानसभेत लोकप्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आमचा मुंबईवर हक्क आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना महाराष्ट्रातील (मति हीन) नेते बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी करत असतात. याला प्रत्युत्तर देण्यासाठी कर्नाटक सरकारने मुंबईला केंद्रशासित करावे, अशी मागणी त्यांनी त्यांनी केली.
नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे, आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
#LaxmanSavadi #Belgaum #MaharashtraKarnataka #SupremeCourt #BorderDispute #Mumbai #CentralGovernment #AmitShah #BasavarajBommai #EknathShinde #PoliticalDebate #LegislativeAssembly #NagpurSession #StateRights #RegionalPolitics #Governance #PublicRepresentation #PoliticalTensions #WinterSession #IndianPolitics
Laxman Savadi Belgaum Border Dispute Mumbai
Laxman Savadi Belgaum Border Dispute Mumbai
Laxman Savadi Belgaum Border Dispute Mumbai
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements