बेळगाव—belgavkar : बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विविध प्रकारची कामे राबविण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र कामे झालीच नाहीत. ग्रामपंचायत पीडीओ व सदस्यांनी या पंचायतीमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित बांधव व नागरिकांनी केला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दलित बांधवांनी केला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी म्हणून अनेक योजनांमधील निधी हडप करण्यात आला आहे. प्रशासनाचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. अशा तक्रारी इथल्या नागरिकांनी केल्या आहेत. अखेर संतप्त झालेल्या दलित बांधव व भागातील नागरिकांनी बुधवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन छेडले.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements