Ayodhya Ram Mandir
ISRO captures satellite images of Ayodhya Ram Temple : उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन सोमवारी होणार आहे. याशिवाय रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमही आहे. या दरम्यान, भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. सॅटेलाइट फोटोंमध्ये दशरथ महाल आणि शरयू नदीही स्पष्टपणे दिसत आहे. सॅटेलाइट फोटोमध्ये नूतनीकरण केलेले अयोध्या रेल्वे स्थानकही दिसत आहे.
भारताकडे सध्या 50 हून अधिक उपग्रह अवकाशात आहेत. त्यापैकी काहींची व्यापकता एक मीटरपेक्षा कमी आहे. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राने अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे छायाचित्र काढण्याचे काम केले आहे. ISRO ने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये २.७ एकरात पसरलेल्या श्री राम मंदिराची जागा स्पष्टपणे दिसू शकते. उपग्रहांच्या भारतीय रिमोट सेन्सिंग सिरीजचा वापर करून त्याचे तपशीलवार दृश्य देखील दर्शविले गेले आहे. अयोध्येतील रामललाच्या सोहळ्यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) स्वदेशी उपग्रहाचा वापर करून अंतराळातून भव्य राम मंदिराची पहिली झलक दाखवली आहे.
#RamMandir from Space!@isro captures stunning satellite images of Ayodhya’s Ram Temple. The majestic Dashrath Mahal and the tranquil Saryu River take center stage in these snapshots. Notably, the recently revamped Ayodhya railway station stands out prominently in the detailed… pic.twitter.com/4Sn4R3JaZH
— MyGovIndia (@mygovindia) January 21, 2024
मंदिराच्या बांधकामाच्या इतर टप्प्यांमध्येही इस्रो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अयोध्येतील या भव्य प्रकल्पातील एक मोठे आव्हान म्हणजे प्रभू रामाची मूर्ती बसवण्याची नेमकी जागा ओळखणे. मंदिराच्या बांधकामादरम्यान प्रभू रामाचे नेमके स्थान ओळखण्याची जबाबदारीही इस्रोकडे सोपवण्यात आली होती. राम मंदिर ट्रस्टला प्रभू रामाची मूर्ती 3×6 फूट जागेवर ठेवायची होती. जिथे रामाचा जन्म झाला असे मानले जाते (गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला Photo).
Ayodhya Ram Mandir : First picture of the temple captured from space by Indian satellite ISRO
FIRST LOOK : ISRO captures satellite images of Ayodhya Ram Temple
ISRO satellite images Ayodhya Ram Temple. ISRO satellite images Ayodhya Ram Temple
ISRO satellite images Ayodhya Ram Temple
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements