Israel-Hamas War : हमास हा पॅलेस्टिनी इस्लामी कट्टरतावादी गट आहे जो गाझा पट्टीवर राज्य करतो. हमासने इस्रायलच्या विध्वंसाची शपथ घेतली आहे आणि 2007 साली गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून इस्रायलशी अनेक युद्धे केली आहेत. इस्राईल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये मागील 24 तासांमध्ये 150 नागरिकांचा मृत्यू झाला असून 313 नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती बुधवारी गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली (Israel-Hamas War 150 killed in Gaza IDF continues to fight militants).
दरम्यान, इस्राईलच्या सैन्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गाझाच्या उत्तरेमध्ये इस्राईलच्या सैन्य दलाने केलेल्या कारवाईमध्ये हमासच्या 15 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे येथील शाळेच्या इमारतीमध्ये निर्माण केलेल्या दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत गाझा पट्टीतील 26 हजार 900 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सामान्य नागरिक किती आहेत याची आकडेवारी यात देण्यात आलेली नाही.
हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाइकांनी अपहृतांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अपहृतांच्या सुरक्षिततेपेक्षा राजकीय नेतृत्वाला त्यांची राजकीय धोरणे महत्त्वाची वाटत असल्याची भीती एका अपहृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अपहृतांची सुटका करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे आणि त्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे इस्राईलच्या सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. इस्रायलनेही हमासवर वारंवार हवाई हल्ले केले आहेत आणि सुरक्षिततेचे कारण देऊन इजिप्तच्या मदतीने गाझा पट्टीवर 2007 पासून नाकेबंदी केली आहे.
Israel-Hamas War 150 killed in Gaza
Israel-Hamas War 150 killed in Gaza
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements