अमेरिकेत गेल्या महिन्यापासून 5 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यात आता विवेक चंदर तनेजा (वय 41) या भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. वॉशिंग्टनमध्ये एका हॉटेलच्या बाहेर झालेल्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री दोन वाजता घडली. तनेजा यांची अज्ञात व्यक्तीशी वादावादी झाल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून ढकलून देण्यात आले (Indian-origin executive dies after being assaulted in US).
तनेजा यांचे डोके पदपथावर आपटले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी जखमी तनेजा यांना रुग्णालयात दाखल केले. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. तनेजा यांची हत्या झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. विवेक तनेजा हे डायनॅमो टेक्नॉलॉजीज या तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक होते. अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारला तंत्रज्ञान विश्लेषक म्हणून ते सेवा देत होते, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिल्याचे ‘एनबीसी वॉशिंग्टन’ने म्हटले आहे. तनेजा यांनी व्हर्जिनिया विद्यापीठ, जॉर्ज मेसन विद्यापीठ आणि जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती.
या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाला. तनेजा यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि तिचा शोध घेण्यासाठी मेट्रोपॉलिटन पोलिस लोकांची मदत घेत आहेत. कोलंबिया जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडातील संशयितांना अटक करण्यासाठी त्यांची माहिती पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून 25 हजार डॉलरचे बक्षीस दिले जाते. त्यानुसार तनेजा यांच्या हल्लेखोरांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Indian-origin executive dies in US
Indian-origin executive dies in US
Indian-origin executive dies in US
Indian-origin executive dies in US
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements