Indian Army New Fitness Policy : भारतीय लष्कराने लठ्ठपणा किंवा वाईट जीवनशैली जगणाऱ्या सैनिकांविरोधात कारवाईची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने नवीन नियम लागू केले आहेत. याअंतर्गत जवानांच्या वेगवेगळ्या तपासण्या होतील. विशेष म्हणजे सैनिकांना सुधारण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात येईल. सुधारणा न झाल्यास सैनिकांच्या सुट्ट्या कमी करण्यासारखे निर्णय घेतले जाऊ शकतात.
policy not only imposes punitive action for overweight personnel with “no improvement within 30 days” but also introduces additional tests to the existing ones, requiring the maintenance of an Army Physical Fitness Assessment card (APAC) for each individual.
नव्या नियमांनुसार सर्व सैनिकांना आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेट कार्ड तयार ठेवावे लागणार आहे. शारीरिक दृष्टीने अयोग्य आणि लठ्ठपणा आल्यामुळे अनेक आजार बळावतात. याव लगाम लावण्याचा आणि सैनिकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लष्कर प्रयत्न करत आहे. जे सैनिक टेस्टमध्ये अपयशी ठरतील किंवा लठ्ठ आढळतील. त्यांना सुरुवातीला 30 दिवसांचा वेळ सुधारण्यासाठी देण्यात यईल. तरीही सुधारणा झाली नाही तर त्यांच्या सुट्टा कमी करण्यात येतील आणि टीडी कोर्सेस कमी करण्यात येतील.
सर्व सैनिक दलांना यासंदर्भातील नोटिफिकेशन पाठवण्यात आलं आहे. सध्या प्रत्येक तीन महिन्यांनी बॅटन फिजिकल इफिशीएंसी टेस्ट आणि फिजिकल प्रोफीशियंसी टेस्ट होते. BPET टेस्टमध्ये जवानाला 5 किलोमीटर पळणे, 60 मीटरची स्प्रिंट, दोरीच्या साहाय्याने वरती चढणे आणि निश्चित वेळेमध्ये 9 फूट खड्डा पार करावा लागतो. वयानुसार ही वेळ बदलत असते.
सैनियांची BPET आणि PPT टेस्ट तर केली जाईलच, पण इतर काही टेस्टचा समावेश देखील करण्यात आला आहे. यात 10 किमीचे स्पीड मार्च आणि 6 महिन्यांत 32 किमीचा रुट मार्च याचा समावेश असेल. सर्व सैनिकांना फिजिकल असेसमेंट कार्ड तयार ठेवावे लागेल. तसेत त्याचे निष्कर्ष 24 तासांमध्ये उपलब्ध करुन द्यावे लागतील. रिपोर्टनुसार, ब्रिगेडियर रँकचे अधिकार, दोन कर्नल आणि एक मेडिकल अधिकारी तीन महिन्यांना जवानांच्या फिटनेसचे मूल्यांकन करतील.
Indian Army New Fitness Policy
Indian Army New Fitness Policy
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements