मागील काही दिवसांपासून भारत-म्यानमार सीमेजवळ संघर्ष सुरू आहे. म्यानमार लष्कर आणि लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्यांमधील या संघर्षामुळे परिस्थिती चिघळू लागली आहे. बंडखोरांकडून सैनिकांवर हल्ले केले जात असल्याने त्यांना जंगलात लपून राहावे लागत आहे. मागील तीन महिन्यांत त्यापैकी जवळपास 600 हून अधिक सैनिक मिझोराममध्ये घुसल्याने भारताची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मोठी घोषणा केली आहे.
मिझोराम (Mizoram) सरकारने सध्याची स्थितीबाबत केंद्र सरकारला (Central Government) अलर्ट केले आहे. मिझोराममधील लांगटलाई जिल्ह्यात म्यानमारच्या सैनिकांनी आश्रय घेतला आहे. त्यांना ताब्यात घेऊन म्यानमारमध्ये परत पाठविण्याची विनंती राज्य सरकारने केली आहे. सरकारकडून म्यानमारमधील (Myanmar) नागरिकांनाही आश्रय देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री लालदुहोमा (Lalduhoma) यांनी शिलाँग येथे पूर्वोत्तर राज्यांच्या परिषदेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी भारतात आलेल्या म्यानमारच्या सैनिकांना तातडीने परत पाठविण्यावर जोर दिल्याचे समजते. सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लालदुहोमा यांनीही चिंता व्यक्त केली आहे. लालदुहोमा यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 450 सैनिकांना परत पाठवण्यात आले आहे. म्यानमारमधून अनेक लोक मिझोराममध्ये शरण घेण्यासाठी येत आहेत. मानवतेच्या भावनेतून आम्ही त्यांना मदत करीत आहोत. सैनिकही आश्रय घेत आहेत. म्यानमारमध्ये 2021 मध्ये सत्ताबदल झाल्यापासून हा प्रकार वाढला आहे.
भारत आणि म्यानमार सीमेवरील नागरिकांना सध्या मुक्त संचार आहे. 1970 मधील करारानुसार दोन्ही देशांतील नागरिकांना इकडे तिकडे सहजपणे ये-जा करता येते. त्यांची संस्कृती आणि श्रद्धा समान असल्याचे मानले जाते. त्यामुळे १९७० पासून ही मुभा देण्यात आली आहे. आता अमित शाहांनी ही मुभा बंद करण्याचे सुतोवाच केले आहे. सीमेवर कुंपण उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. बांग्लादेश सीमेप्रमाणेच म्यानमान सीमेचेही संरक्षण केले जाईल, असे शाहांनी आज आसाममध्ये बोलताना सांगितले. त्यामुळे मुक्त संचार थांबणार असून ये-जा करण्यासाठी व्हिसाची गरज भासू शकते.
India’s border with Myanmar to be fenced to restrict ‘infiltrators’: Amit Shah
Amit Shah announces fencing to be built on Myanmar border. fencing on Myanmar border Amit Shah. fencing on Myanmar border Amit Shah
fencing on Myanmar border Amit Shah
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements