2023 या वर्षामध्ये हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून समाधानकारक प्रमाणात मुक्कामी असेल असं वाटत असतानाच त्यानं दडी मारली. कैक वर्षांनंतर 2023 मध्ये प्रचंड उन्हाळा झाला आणि 2023 हे वर्ष उष्ण हवामानाचं ठरलं. ‘अल निनो’ ही हवामान प्रणाली सक्रिय असल्यामुळंच मान्सूनवर त्याचे हे थेट परिणाम दिसून आल्याचं सांगण्यात आलं (El Nino conditions and monsoon)
अल निनोचा परिणाम : 2024 च्या जून महिन्यापर्यंत अल निनोचा हा परिणाम कमी होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आल्यामुळं आता यंदाच्या वर्षी समाधानकारक मान्सूनची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अल निनो म्हणजे काय? : अल निनो ही हवामानातील एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया असून, यामध्ये पॅसिफिक महासागराच्या पृष्ठावरील पाण्याचं तापमान वाढतं आणि त्याचे परिणाम जगभरातील तापमानात दिसतं. परिणामी हिमवृष्टीच्या दिवसांत कोरडं वातावरण, पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा असं वातावरण पाहायला मिळत आहे.
जागतिक स्तरावर निरीक्षण करणाऱ्या दोन हवामान संस्थांच्या माहितीनुसार आता अल निनोचा परिणाम कमकुवत होताना दिसत आहे. असं असलं तरीही ऑगस्ट महिन्यापर्यंत ‘अल नीना’ची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी माहिती निरीक्षणातून समोर आली आहे.
मान्सूनचा अंदाज : अल नीनाची परिस्थिती दिसल्यास यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण सर्वसामान्य किंवा त्याहून जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली.
मान्सून इतका महत्त्वाचा का? : भारतात दरवर्षी होणाऱ्या पर्जन्यमानामध्ये 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनपासून मिळतो. हा नैऋत्य मान्सून शेतकऱ्यांसाठी अतिश. महत्त्वाचा असून, या मान्सूनचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होताना दिसतो.
El Nino conditions and monsoon
El Nino conditions and monsoon
El Nino conditions and monsoon
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements