ED arrives at Jharkhand CMs house : झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचले आहेत (ED arrives at Jharkhand CM’s house for questioning on alleged land scam). कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रांची प्रशासनाने हिनू विमानतळावरील ईडी कार्यालयाची सुरक्षा वाढविली आहे. कार्यालयाबाहेर पोलिसांच्या बॅरिकेड्ससह सीआरपीएफचे जवान तैनात आहेत.
मुख्यमंत्री निवास्थानाबाहेरही कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रांचीतील वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून 1000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ईडी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री निवास्थाबानाजवळ ट्रॅफिक डायव्हर्जन राहील, तसेच येण्या-जाण्यावरही बंदी असेल. तत्पूर्वी, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने राज्याच्या पोलीस प्रमुखांना एक प्रत्र लिहून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासंदर्भात विनंती केली होती.
ईडीने गेल्या 13 जानेवारीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आठव्यांदा समन्स जारी करून त्यांना 16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान चौकशीसाठी उपलब्ध राहण्यास सांगितले होते. यापूर्वी ते 7 समन्स मिळूनही ईडी समोर हजर झाले नव्हते. यानंत, केंद्रीय तपास यंत्रणा 20 जानेवारीला आपल्या निवासस्थानी निवेदन घेऊ शकते, असे ईडीच्या समन्सला उत्तर देताना मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटले होते (Land For Job Scam : राबडीदेवी यांच्याविरुद्ध आरोपपत्र).
Enforcement Directorate (ED) officials on Saturday arrived at Jharkhand chief minister Hemant Soren’s residence in the state capital, Ranchi, for questioning in connection with the alleged land scam. The central agency sent a letter asking the CM to be available for questioning on the matter between January 16 and 20. Soren told the ED to record his statement at his residence on January 20.
ED arrives at Jharkhand CMs house
ED arrives at Jharkhand CMs house
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements