Australia vs West Indies T20I : ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात डेव्हिड वॉर्नरने (David Warner) विश्वविक्रमी कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नरचा हा ऑस्ट्रेलियाकडून 100वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना ठरला आणि एकाच संघाकडून तिन्ही फॉरमॅट (कसोटी, वन डे व ट्वेंटी-20) मध्ये 100 हून अधिक सामने खेळणारा तो जगातील तिसरा (विराट कोहली व रॉस टेलर) फलंदाज ठरला. पण, या विराट व टेलर यांना जे जमले नाही, ते वॉर्नरने या सामन्यात करून दाखवले (David Warner joins elite company with 100 appearances in all formats).
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि जॉश इंग्लिस यांनी पहिल्या 8 षटकांत 93 धावा कुटल्या. जेसन होल्डरने ही जोडी तोडली आणि इंग्लिसने 25 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकाराने 39 धावा केल्या. पण, वॉर्नरने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली. कर्णधार मिचेल मार्श (16), ग्लेन मॅक्सवेल (10) व मार्कस स्टॉयनिस (9) यांना अपयश आले. वॉर्नर 36 चेडूंत 12 चौकार व 1 षटकारासह 70 धावांवर बाद झाला (David Warner scripts history, becomes first-ever player to register 50+ scores in 100th match of T20I, Test, and ODI).
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 व्या सामन्यात 50+ धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने 100 व्या कसोटीत द्विशतक आणि 100 व्या वन डे सामन्यात शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 बाद 213 धावा केल्या आहेत. वॉर्नरने 112 कसोटीत 26 शतकं व 37 अर्धशतकांसह 8786 धावा केल्या, वन डेत 161 सामन्यांत 22 शतकं व 33 अर्धशतकांसह 6932 धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त 100 सामन्यांत 3070 धावा त्याच्या नावावर आहेत आणि त्यात 1 शतक व 24 अर्धशतकं आहेत.
David Warner 50 plus score 100th match
David Warner 50 plus score 100th match
David Warner 50 plus score 100th match
David Warner 50 plus score 100th match
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements