पीएफ खातेधारकांना (PF Account Holder) मोठं गिफ्ट देत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees Provident Fund Organisation) शनिवारी व्याजदरात मोठी वाढ करण्याची घोषणा केलेली. त्या घोषणेनुसार, पीएफच्या व्याजदर (PF Interest Rate) 8.25 टक्के करण्यात आला आहे. यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष आहे, या वर्षात पीएफवरील व्याज वाढ झाल्यानंतर आता सरकार महागाई भत्त्यात (DA Hike) वाढीची घोषणा कधी होणार याची अनेकजण वाट पाहत आहेत (Dearness Allowance (DA)). मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार मार्च 2024 मध्ये महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतं. असं झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी असेल, कारण त्यांना येणारा महागाई भत्ता तब्बल 50 टक्के होईल (7th Pay Commission : EPFO hikes interest rate on PF, DA hike expected soon).
EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं (CBT) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासाठी नवा व्याजदर जाहीर केला आहे. EPFO नं देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांना भेट दिली असून व्याजदरात वाढ करुन 8.25 टक्के केला आहे. पीटीआयनुसार, पीएफ खातेधारकांना आता पूर्वीपेक्षा 0.10 टक्के जास्त व्याज मिळणार आहे. गेल्या वर्षी 28 मार्च रोजी EPFO नं 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदर जाहीर केला होता. पीएफ व्याजदरात वाढ झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्येही डीए वाढीची अपेक्षा वाढली आहे.
मार्चमध्ये 4 टक्क्यांच्या महागाई भत्त्याची अपेक्षा
सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवतं आणि जानेवारी-जून सहामाहीसाठी महागाई भत्ता मार्च 2024 मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणेची शक्यता आहे.
दरम्यान, लवकरच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के आहे, केंद्र सरकारनं जर महागाई भत्त्यात वाढ केली, तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 50 टक्के होऊ शकतो.
DA hike expected soon
DA hike expected soon
DA hike expected soon
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements