बेळगाव : उगार खुर्द (ता. कागवाड) : उगार नगरपरिषदेचे नगरसेवक सुजय राजाराम फराकट्टे (वय ५०) यांचे शनिवारी सायंकाळी डेंग्यू आजाराने मिरज येथे निधन झाले. सुजय फराकटे यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी उपचार सुरू असतानाच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते.
डेंग्यू किंवा डेंगी – हा शब्द आलाय स्वाहिली भाषेतल्या ‘Ka-dinga pepo’ या शब्दांवरून. याचा अर्थच होतो cramp-like seizure म्हणजे पिळवटून दुखणं.
डेंग्यूला Bonebreak Fever अर्थात हाडं मोडून काढणारा ताप असंही म्हटलं जातं. या तापामुळं काही जणांना हाडं आणि स्नायूत खूप दुखतं. डेंग्यूचं निदान NS1,IgM आणि IgG या रक्ताच्या तीन चाचण्या करून होतं. डेंग्यू ताप हा डेंग्यू विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याला ‘ब्रेक बोन’ ताप असेही म्हणतात.
जरी अनेक डेंग्यू संसर्ग लक्षणे नसलेले असतात किंवा फक्त सौम्य आजार निर्माण करतात, व्हायरस अधूनमधून अधिक गंभीर प्रकरणे आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
Councilor Ugar Municipal Council death dengue
Councilor Ugar Municipal Council death dengue
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements