Ranji Trophy 2023-24 : रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात ग्रुप स्टेज सामने संपले आहे आणि बाद फेरीचे सामने लवकरच सुरू होतील. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुढील 3 वर्षात आपल्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला ₹ 1 कोटी रुपये आणि बीएमडब्ल्यू कार देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे (BMW car, 1 crore each: Hyderabad cricket chief offers big reward to players if they win Ranji Trophy).
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्याने पुढील तीन वर्षात रणजी ट्रॉफी जिंकल्यावर संघातील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये रोख आणि एक बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली जाईल. त्यांच्या या घोषणेची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही या पोस्टमध्ये टॅग करण्यात आले आहे.
रणजी ट्रॉफीच्या येत्या हंगामात हैदराबादला ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल, कारण या संघात अनेक खेळाडू असतील ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवही आहे. या मोसमात संघाचे नेतृत्व करणाऱ्या तिलक वर्मानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात हैदराबादने दोनदा ट्रॉफी जिंकली आहे. संघाने 1937/38 मध्ये पहिले विजेतेपद जिंकले, त्यानंतर 1986/87 मध्ये हैदराबाद दुसऱ्यांदा चॅम्पियन बनले. त्याच वेळी, संघ 1942/43, 1964/65 आणि 1999/2000 मध्ये उपविजेता ठरला होता.
BMW car and 1 crore if Hyderabad win Ranji Trophy
BMW car and 1 crore if Hyderabad win Ranji Trophy
BMW car and 1 crore if Hyderabad win Ranji Trophy
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310