घरगुती वापरासाठी Bharat Dal डाळ कुठं मिळते?
डाळी हा आहारातील मुख्य घटक असून प्रथिने आणि इतरही अनेक आवश्यक घटक शरीराला मिळण्यासाठी आहारात डाळींचा समावेश असणे आवश्यक असते. हाच विचार करुन केंद्र सरकारने कमी किमतीत डाळ उपलब्ध करुन देण्याचे ठरवले. यासाठी अन्न मंत्रालयातर्फे ‘भारत डाळ’ या नावाने बाजारात डाळीची विक्री सुरु करण्यात आली आहे. 1 किलो पॅकसाठी ₹ 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी ₹ 55 रुपये प्रति किलो या दराने डाळीची विक्री सुरु आहे. सरकारी अनुदान असल्याने ही डाळ या दरात देणे शक्य असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे (Bharat Dal available at Rs 60 per kg).
नाफेड म्हणजेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या दिल्ली-एनसीआर परिसरातील किरकोळ विक्री केंद्रांमध्ये चणा डाळीची विक्री होत आहे. चणाडाळ वितरणासाठी नाफेडने डाळ दळणे आणि ती पॅक करणे याची जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून भारत डाळीचे वितरण केले जात आहे. डाळ बाजारात आणण्याव्यतिरिक्त, राखीव साठ्यातून डाळींचा पुरवठा राज्यांना त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी, लष्कर आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना देखील केला जातो.
डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने चणा डाळीसोबतच तूर, उडीद, मूग, मसूर या डाळींचा साठाही केला आहे. डाळींच्या किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी काही डाळींवरील आयात करही सरकारतर्फे माफ करण्यात आला आहे. बाहेर इतर ब्रँडची चणा डाळ 80 रुपयांना असून भारतची चणा डाळ 60 रुपयांना उपलब्ध असल्याने ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या सुविधेला नागरीकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे असे ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहीत कुमार सिंग म्हणाले. येत्या काळात मोदी सरकार डाळीप्रमाणेच तांदळाचीही विक्री करणार असून या तांदळाची किंमत 29 रुपये किलो असल्याचे सांगण्यात येत आहे.
Bharat Dal available at Rs 60 per kg
Bharat Dal available at Rs 60 per kg
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements