बेळगाव—belgavkar : बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे तब्बल ₹ 3 कोटी रुपयांचा 6 गुंठ्यांचा भूखंड परस्पर लाटला आहे. माडमगेरी (ता. यरगट्टी) ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी (पीडीओ) व तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा गैरव्यहार केला आहे. परंतु, त्याचा योग्य तपास होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते लक्काण्णा सवसुद्दी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, नव्याने उदयास आलेल्या यरगट्टी तालुक्यातील जमिनीचे भाव वाढले आहेत. याचाच फायदा घेत सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवत काहीजण भूखंडांचे बनावट मुद्रांक बनवून त्याद्वारे परस्पर विक्री करत आहेत. माडमगेरीतील पीडीओ व सौंदत्ती ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही बांधकाम व्यावसायिकांकडून लाच स्वरुपात भूखंड घेतले आहेत. या बदल्यात त्यांनी बनावट मुद्रांकाद्वारे भूखंड नावावर चढवून ते परस्पर विकल्याचा आरोप त्यांनी केला.
मुद्रांक जिथून खरेदी केला, ती सोसायटी सध्या बंद आहे. मुद्रांक घेतलेली तारीख 24 डिसेंबर 2012 आहे, तर त्यावर नोटरीची तारीख 12 डिसेंबर 2012 आहे. मुद्रांक खरेदीच्या आधीच नोटरी कशी झाली? विशेष म्हणजे, नोटरी करणारे वकीलही हयात नाहीत. हा सर्व प्रकार पोलिसांच्या नजरेला आणून दिला आहे. त्यांनी एफआयआर केला असला तरी अद्याप कुणावरही ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख व वकीलांना माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही सवसुद्दी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Belgaum Yaragatti ₹3 crore land fraud pdo belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Yaragatti ₹3 crore land fraud pdo
Belgaum Yaragatti ₹3 crore land fraud pdo
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements