बेळगाव—belgavkar : तिरुपती बालाजी आणि शिर्डी साई मंदिराच्या धर्तीवर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिर (यल्लम्मा) येथेही भक्तांना प्रसादासाठी लाडू उपलब्ध करून दिला जाणार आहे. मंदिर प्रशासनातर्फे लाडू उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात्रेसह सणांना सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीव एप्रिल महिन्यांतील यात्रेवेळी डोंगरावर लाखोंची गर्दी होते.
श्रावण व नवरात्रीमध्ये देखील डोंगरावर भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यामुळे रेणुका देवीच्या दर्शनासाठी वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्याप्रमाणे तिरुपती व शिर्डी येथे प्रसादाच्या लाडूचे वितरण केले जाते, त्याचप्रमाणे रेणुका देवी मंदिर परिसरात लाडू उपलब्ध करून दिले जावेत, अशी मागणी गेली अनेक वर्षे भाविकांकडून होत होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने पुढाकार घेत वर्षभर लाडू उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. लाडू उपलब्ध करून देण्यासाठी ज्या स्वयंसेवी संस्था किंवा कंपन्या पुढे येतील, त्यामधून एकाची निवड केली जाणार आहे.
ज्या भाविकांना लाडू खरेदी करावयाचे आहेत, त्यांना माफक दरात लाडू उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी मंदिर परिसरात विशेष काऊंटर सुरू केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात रेणुका देवीच्या भक्तांना लाडूचा प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Belgaum Saundatti Yallamma Temple Ladu Prasad belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Saundatti Yallamma Temple Ladu Prasad
Belgaum Saundatti Yallamma Temple Ladu Prasad
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements