बेळगाव—belgavkar : प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त एस. एन. सिध्दरामप्पा यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते वाहतूक सुरक्षा आढावा बैठक झाली. तेथे याची माहिती देण्यात आली. बेळगावला यापूर्वी प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा सुरु होती. मध्यवर्ती बसस्थान, रेल्वे स्थानक आणि नेहरुनगर येथून सेवा मिळत होती. मात्र, विविध कारणांनी योजना मागे पडली.
मात्र, पोलिस आयुक्तांनी शहरात पुन्हा सेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, दोन ते तीन ठिकाणी सेवा पुरविली जात आहे. यापूर्वी या योजनेतील त्रुटींमुळे सेवा गुंडाळली. आता पुन्हा अंमलबजावणी करण्याचा निर्णय रस्ते सुरक्षा बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे बाहेर गावांहून येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून यासंदर्भात सूचना केली आहे. मात्र, संपूर्ण अंमलबजावणी करण्याची आणि त्याला पूरक सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असेल. यामुळे पोलिस आयुक्तांनी त्याची घोषणा केली असून कार्यवाही कधीपासून सुरू होते, याकडे लक्ष लागून आहे.
Belgaum Prepaid Auto Rickshaw Services Commissioner belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Prepaid Auto Rickshaw Services
Belgaum Prepaid Auto Rickshaw Services
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements