बेळगाव—belgavkar : पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटनेतर्फे उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने हरियाणाच्या सोनू कुमारला अवघ्या तिसऱ्या मिनिटात एकचाक डावावर चितपट करून पिरनवाडीचे मैदान मारले. प्रथम क्रमांकाची कुस्ती सतीश पाटील, माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी, रवी मुचंडीकर, सचिन गोरले, आप्पाजी मुचंडीकर, यांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्या मिनिटालाच आक्रमक पवित्रा घेत शिवराज याने सोनू कुमारला एकलांगीवर चितपट करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या मिनिटाला शिवराज राक्षे याने सोनू कुमारला एकचाकवर आसमान दाखवले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व आंतरराष्ट्रीय चॅम्पियन बरकत अली (हरियाणा) यांच्यात झाली. किरण भगत याने अवघ्या दुसऱ्या मिनिटाला एकेरी पट काढत बरकत अलीला चितपट केले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने पंजाब केसरी सद्दाम पंजाब याला अवघ्या दीड मिनिटात एकलांगी चढवून आसमान दाखवले.
चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत नागराज बशीडोनी याने उमेश चव्हाण याला गुणाच्या आधारावर चितपट केले. निर्धारित वेळेत कुस्ती निकाली न झाल्याने बशीडोनीने गुणांवर विजय मिळवला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन बाळ बोडके याने अमितकुमार (दिल्ली) याच्यावर विजय मिळवला, सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित पाटील याने सुमित हरियाणाला चितपट करून गदा मिळवली.
सातव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व समाधान यांच्यात बरोबरीत सुटली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत कुबेर पिरनवाडी याने विजय मिळवत मेंढ्याचे बक्षीस पटकावले. नववी आणि दहाव्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. या मैदानात पार्थ कंग्राळी, विनायक बेकवाड, प्रथमेश कंग्राळी, राजू शिनोळी, रोहन कडोली, शंकर तीर्थकुंडे, गणेश फडके, मंथन सांबरा, हनुमंत गंदीगवाड, सनी राशिवडे यांनी विजय मिळवला.
Belgaum Peeranwadi Kusti Shivraj Rakshe belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Peeranwadi Kusti Shivraj Rakshe
Belgaum Peeranwadi Kusti Shivraj Rakshe
Belgaum Peeranwadi Kusti Shivraj Rakshe
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements