बेळगाव—belgavkar : स्वतःला पोटभर अन्न मिळत नसल्याने व आईलाही सांभाळू शकत नसल्याच्या मनस्तापातून मुलाने आत्महत्या केल्याचा कांगावा करत महिलेने तशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली. काही कन्नड वृत्तपत्रांमध्ये याबाबत छापून आल्यानंतर पोलिसांनी याचा शोध घेतला. तपासाअंती सदर महिला त्या तरुणाची आई नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुधवारी दिली. पोटभर जेवण मिळत नसल्याने तरुणाने संपवले जीवन अशा आशयाचे वृत्त दोन दिवसांपूर्वी काही कन्नड दैनिकांमधून प्रसिद्ध झाले. या तरुणाचा मृतदेह नंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळाल्याने पोलिसांनी याचा तपास सुरु केला. त्यानंतर सदर महिला या तरुणाची आई नसल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. गुळेद म्हणाले, या तरुणाची व महिलेची ओळख होती. काही दिवसांपूर्वी ते गोव्याला गेले. तेथून रेल्वेने परतताना अन्य प्रवाशांशी भांडण झाल्याने त्यांना अळणावरजवळ रेल्वेतून उतरविण्यात आले. यानंतर तरुण बसवराज वेंकट (वय 30) सदर महिलेकडून काही रक्कम घेऊन अळणावरपासून काही अंतरावर नंदगड ठाण्याच्या हद्दीत जंगल परिसरात गेला. तेथे त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता शांतव्वा (वय 55) नामक महिलेसोबत हा तरुण फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या महिलेला गाठून माहिती घेतली. त्यावेळी सदर महिलेने बसवराज हा आपला मुलगा होता. आम्हा दोघांना पोटभर जेवण मिळत नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. हीच माहिती तिने एका सामाजिक संघटनेलाही दिली. त्यामुळे, या महिलेची पोलिसांच्या सहकार्याने एका वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली.
पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. सदर महिलेला काही माहिती विचारली तर ती प्रत्येकवेळी वेगवेगळी उत्तरे देऊ लागली. त्यामुळे, पोलिसांचा संशय बळावला. सदर तरुण मूळचा हावेरी जिल्ह्यातील यलगच्चीतील आहे. तिथे चौकशी केली असता त्याचे आई-वडील, भाऊ व बहिणी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, या महिलेची कसून चौकशी केली असता तिने हे सर्व कपोलकल्पित सांगितले असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेलाही चार मुले असून ती त्यांच्यापासून वेगळी राहते. सहानुभूती मिळविण्यासाठी तिने हा प्रकार केल्याचे समोर आल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे, असे पोलिसप्रमुखांनी स्पष्ट केले.
Belgaum Nangad Police Suicide case Mother belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Nangad Police Suicide case Mother
Belgaum Nangad Police Suicide case Mother
Belgaum Nangad Police Suicide case Mother
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements