बेळगाव—belgavkar : विस्ताराने मोठ्या बेळगाव आणि तुमकूर जिल्ह्यांच्या विभाजनाला तूर्तास ब्रेक लागला आहे. या जिल्ह्यांच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव सध्या तरी नसल्याचे महसूल खात्याने स्पष्ट केले आहे. सर्वच जिल्ह्यांच्या हद्द निश्चित करण्यासाठी अधिसूचना देण्यात आल्या होत्या, असेही सांगण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेवर आता सरकारी उत्तर मिळाले आहे. राज्य शासनाने 12 फेब्रुवारी रोजी बेळगाव आणि तुमकूर जिल्ह्याच्या हद्द निश्चितीबाबत अधिसूचना जारी केली होती. तेव्हापासून या दोन्ही जिल्ह्यांचे विभाजन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली.
विभाजनाच्या प्रक्रियेला चालना देण्यात आल्याचा निष्कर्ष अधिसूचनेवरून काढण्यात आला होता. या अधिसूचनेच्या आधारे प्रादेशिक आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना हद्दीचे सर्वेक्षण करण्याची सूचना दिली होती. बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन करुन बेळगावसह चिकोडी आणि गोकाक जिल्हे अस्तित्वात आणण्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अलिकडे गोकाक जिल्ह्याला विरोध होत असून बैलहोंगल जिल्हा निर्माणाची मागणी केली जात आहे.
आमदार महांतेश कौजलगी यांनी गोकाक जिल्ह्याला जाहीर विरोध केला होता. या घडामोडींमुळे बेळगावातील राजकारणासह राज्यातील राजकारणात चर्चा झाली होती. बेळगावच्या विभाजनाविषयी सुमारे तीन दशकांआधीच निर्णय घेण्यात येणार होता. 1998 मध्ये राज्यात 7 नव्या जिल्ह्यांचे निर्माण झाले. पण, बेळगावात मराठी आणि कन्नड भाषिक असल्याने या जिल्ह्याचा विषय बाजूला ठेवण्यात आला होता. आता बदलत्या परिस्थितीत बेळगावच्या त्रिभाजनाची मागणी केली जात आहे. त्यातच हद्द निश्चित करण्यासाठी अधिसूचना दिल्याने त्रिभाजनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, महसूल खात्याच्या स्पष्टीकरणामुळे आणखी काही दिवस यासाठी वाट पहावी लागणार आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महसूल मंत्री कृष्णा ब्यायरेगौडा यांची भेट घेतली. बेळगावच्या विभाजनाबाबत त्यांनी विचारले. पण, मंत्र्यांनी त्यांना कोणताही तसा प्रस्ताव नसल्याचे सांगितले.
सर्व जिल्ह्यांच्या हद्द निश्चितीबाबत अधिसूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक बेळगावबाबत अधिसूचना दिली होती. त्याचा आणि बेळगावच्या विभाजनाचा संबंध नाही. तसा कोणताही प्रस्ताव नाही. कृष्णा ब्यायरेगौडा, महसूल मंत्री
Belgaum may be divided into 3 districts belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum may be divided into 3 districts
Belgaum may be divided into 3 districts
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements