कधी पाणी येणार…?
पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती
बेळगाव—belgavkar : बेळगाव शहरात सध्या चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे 24 तास पाण्यासाठी वाहिनी घालण्यात येत आहे. पण, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. पाणी कधी येणार, याची आकडेमोड करावी लागते. पण आता L & T कंपनीने ग्राहकांना एक दिवस आधी एसएमएस पाठवून पाणीपुरवठ्याची माहिती देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे लोकांना सोयीचे झाले आहे.
जस जसे उन्हाचे चटके वाढत जातील, तसतसे पाण्याचे दुर्भिक्ष्य होणार आहे. प्रशासनाने कितीही नियोजन करण्यात आले आहे, असे सांगितले तरी अनेक ठिकाणी आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. आगामी महिनाभरात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती लोकांना आणि प्रशासनालाही आहे. आता शहरात चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो.
ग्राहकांना संदेश पाठवून कधी पाणी येणार, याची माहिती : पण, त्याच दिवशी पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे गृहिणींना आकडेमोड करत नेमके कधी पाणी येईल, याचा अंदाज बांधावा लागतो. त्यामुळे आता एल ॲण्ड टी कंपनीकडून ग्राहकांना संदेश पाठवून कधी पाणी येणार, याची माहिती देण्यात येत आहे.
एल ॲण्ड टी कंपनीकडून येणाऱ्या या संदेशात एक दिवस आधी पाणीपुरवठ्याची माहिती देण्यात येत आहे. सर्व प्रभाग आणि गल्ल्यांत पाणी पुरवठ्याची वेळ ठरलेली आहे. त्यामुळे एक दिवस आधी संदेश पाठवून आपल्याकडे या दिवशी पाणी येणार आहे, असा संदेश पाठवण्यात येत आहे. याशिवाय पाणी पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास 1800425 5656 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
Belgaum L and T water supply message belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum L and T water supply message
Belgaum L and T water supply message
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements