Karnataka ‘Yuva Nidhi’ Scheme
पदवीधर विद्यार्थ्यांना ₹ 3000 तर डिप्लोमाधारकांना दरमहा ₹ 1500
बेळगाव—belgavkar : काँग्रेस सरकारच्या पाचव्या गॅरंटीसाठी म्हणजेच युवा निधीसाठी पदवीधर युवकांना आर्थिक प्रोत्साहनासाठी सुरू केलेल्या Yuva Nidhi Scheme च्या ऑनलाईन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झाला होता. युवा निधीअंतर्गत पदवीधर तरुणांना 3000 रुपये तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. राज्य सरकारच्या पाचव्या हमी ‘युवा निधी’ योजनेचा स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते शिमोगा येथील फ्रीडम पार्क येथे प्रारंभ होणार आहे. या योजनेंतर्गत पदवी, पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना युवा निधी योजनेअंतर्गत दोन वर्षांसाठी बेरोजगारी भत्ता दिला जाईल आणि स्किल कनेक्ट पोर्टलवर नोंदणी करून प्रशिक्षण दिले जाणार आहे (belgaum Karnataka Yuva Nidhi Scheme).
सध्या 61 हजार 700 पदवी, पदविकाधारक उमेदवारांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केली आहे. 2022-23 मध्ये एकूण 5.29 लाख विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमपूर्ण केला. ज्यांना पदवीनंतर सहा महिने नोकरी मिळत नाही ते लाभार्थी होण्यास पात्र आहेत. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे. शिकण्यासोबतच कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कौशल्ये निर्माण केली जात असून, बेरोजगारीच्या समस्येला तोंड देण्यासाठी शासनाकडून तरुणांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे. या कार्यक्रमासाठी दावणगिरी, हावेरी, चिक्कमंगळूर, कारवार, चित्रदुर्ग या जिल्ह्यांतून 1.5 लाख युवक-युवती येण्याची अपेक्षा आहे, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आधी राज्यात 4 हमी योजना सुरू झाल्या आहेत. सुमारे गृहज्योती- 90 टक्के, गृहलक्ष्मी – 93 टक्के आणि अन्नभाग्य – 96 टक्के योजनांचा लाभ घेण्यात येत आहे. तसेच शक्ती योजनेच्या माध्यमातून 200 कोटी महिलांनी गेल्या पाच महिन्यांत मोफत प्रवास केला आहे. या योजनांतून एका ग्रामपंचायतीला दरमहा 75 लाखांपर्यंतचे अनुदान मिळत आहे आणि 8 कोटी कुटुंबांना प्रतिवर्षी सरासरी 5000 रुपये भत्ता मिळत आहे. याचा सर्वसामान्यांना फायदा होत आहे. राज्य सरकारने अडचणीत सापडलेल्यांना प्रतिसाद देण्यासाठी लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Karnataka Yuva Nidhi Scheme
Belgaum Karnataka Yuva Nidhi Scheme belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgaum Karnataka Yuva Nidhi Scheme
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements