सोशल मिडियावर पोस्ट अन् वादाला सुरुवात
बेळगाव—belgavkar : मंड्यातील करगोडू गावातील हनुमान मंदिरावरील ध्वज हटविण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता बेळगाव जिल्ह्यातील एम. के. हुबळीत तसेच प्रकरण पुढे आले आहे. कित्तूर तालुक्यामधील एम. के. हुबळी गावात भगवा ध्वज लावण्यावरुन वाद सुरु झाला आहे. यामुळे तणाव निर्माण झाला. हिंदुत्वादी संघटनांनी आंदोलन केल्यामुळे काहीकाळ या गावात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी येथे भेट घेऊन पाहणी केली. पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.
एम. के. हुबळीत भगवा ध्वज होता. मात्र, तो हटविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पण पोलिसांसह ग्रामस्थांनीही याला दुजोरा दिला नाही. त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. शिवाय येथे परत ध्वज बसविण्यासाठी कठड्याचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यातून वाद वाढला. यामुळे दोन दिवसांपासून येथे पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.
सोशल मिडियावर यासंदर्भात पोस्ट आढळून आल्यानंतर हिंदुत्वादी संघटनांनी आंदोलन केले. जिल्हा पोलिस प्रमुख श्री गुळेद यांनी रविवारी येथे भेट दिली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ध्वज उभारण्यास परवानगी नाही. ध्वज उभारणीबाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाल्यानंतर अंलबजावणी करण्यास आम्ही कटिबध्द असल्याचे सांगितले..
Belgaum Hubli Flag Saffron Flag belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Hubli Flag Saffron Flag
Belgaum Hubli Flag Saffron Flag
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements