बेळगाव—belgavkar—belgaum : महिला स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून शेकडो महिलांची फसवणूक झाली आहे. ज्या महिलेने फसवणूक केली आहे, त्या महिलेच्या घरासमोर फसवणूक झालेल्या महिलांनी धरणे धरले. संबंधित महिलेविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. हालभावी (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर एम. बी., काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक झाली असून फशी पडलेल्या महिलांचा आक्रोश लक्षात घेऊन हालभावी येथे बंदोबस्त वाढविण्यात आला. काकती पोलिसांनी यल्लव्वा बन्नीबागी या महिलेची चौकशी सुरु केली आहे
यल्लव्वा व तिचा पती कमलेशकुमार या दोघा जणांनी राणी चन्नम्मा स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून निरक्षर महिलांना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे सांगून फसवणूक केली आहे. 50 हजारांचे कर्ज मिळवून दिल्यानंतर 25000 रुपये यल्लव्वा आपल्याकडे घेत होती. केवळ 25000 संबंधित महिलांना देत होती. यापुढे तुम्ही कर्ज भरायची गरज नाही, तुम्ही घेतलेले कर्ज आम्हीच भरणार आहे, असे सांगण्यात येत होते.
शेवटी थकबाकी वाढल्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांना बँकांकडून नोटिसा सुरु झाल्या. त्यामुळे आपण फसलो गेलो, हे त्या महिलांच्या लक्षात आले. ठरल्याप्रमाणे उर्वरित कर्जाचा भरणा तुम्हीच करा, अशी मागणी करीत फशी पडलेल्या महिलांनी यल्लव्वाच्या घराला घेराव घातला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेऊन काकती पोलीस स्थानकात आणले.
belgaum halbhavi women fraud loan
belgaum halbhavi women fraud loan
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements