बेळगाव—belgavkar : लोकायुक्त (Lokayukt) विभागाने गुरुवारी बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयावर (District Registrar Office) छापा टाकून ₹ 22000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरला रंगेहात पकडले. यामुळे नोंदणी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. लोकायुक्त पथकाने अटक केलेल्या आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरचे नांव सोमशेखर मास्तमर्डी असे आहे.
बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयात आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या सोमशेखर याने विक्रीचे चलन देण्यासाठी अविनाश धामणेकर नामक व्यक्तीकडे ₹ 22000 रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात धामणेकर यांनी सोमशेखरच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार लोकायुक्त ठाण्यात केली होती. सदर तक्रारीची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उस्मान आवटी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून गुरुवारी दुपारी 12.30 वा. नोंदणी कार्यालयावर धाड टाकली.
तसेच सोमशेखर मास्तमर्डी याला 22 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली. लोकायुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हनुमंत रायाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Belgaum District Registrar Office Bribe Arrested Operator belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum District Registrar Office Bribe Arrested Operator
Belgaum District Registrar Office Bribe Arrested Operator
Belgaum District Registrar Office Bribe Arrested Operator
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements