डुंगरपूर केसमध्ये ₹ 14 लाखांचा दंड रामपूरः डुंगरपूर प्रकरणात जेलमध्ये असलेल्या आझम खान याला एमपी-एमएलए कोर्टाने गुरुवारी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच कोर्टाने ₹ 14 लाखांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने त्याला बुधवारी दोषी ठरवलं होतं. आझम खान याच्यावर डुंगरपूर वस्ती जबरदस्तीने रिकामी करणे, मारहाण करणे, तोडफोड करणे, लुटमार करणे आणि धमकावण्याचा आरोप आहे.
हे प्रकरण 6 डिसेंबर 2016 चं आहे, आझम खानवर या प्रकरणात 2019 मध्ये केस दाखल झाली होती. रामपूरच्या एमपी-एमएलए सेशन कोर्टात प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. कोर्टाने आझम खानला दोषी ठरवून निकाल राखून ठेवला होता. डुंगरपूर प्रकरणात गुरुवारी स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश डॉ. विजय कुमार यांनी शिक्षेचा निर्णय दिला. आझम खान सध्या सीतापूर जेलमध्ये आहे.
जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची पेशी झाली. सरकारी वकील शिव प्रकाश पांडे म्हणाले, जबरदस्तीने घर रिकामे करून ते पाडण्याच्या प्रकरणात रामपूरच्या विशेष कोर्टाने सपा नेते आझम खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि 14 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
Azam Khan sentenced to 10 years imprisonment in Dungarpur case
Azam Khan sentenced to 10 years imprisonment
Azam Khan sentenced to 10 years imprisonment
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements