50 इलेक्ट्रिक बस बेळगाव आगाराला देण्याची मागणी
बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव आगाराच्या ताफ्यात 50 बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे विविध मार्गावरील बसफेऱ्यांत वाढ होणार असून प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे. कर्नाटक राज्यात शक्ती योजना लागू झाल्यापासून महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. ज्या मार्गावर विद्यार्थी संख्या अधिक आहे, त्या मार्गावर बसची संख्या वाढवण्याचे संकेत परिवहनने दिले होते. त्याची दखल घेत 50 बस आगारात दाखल झाल्या आहेत.
बेळगाव आगारातून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने अजून आगारात 150 दाखल होण्याची शक्यता आहे. नवीन 50 बस दाखल झाल्या आहेत. ज्या मार्गावर विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात त्या मार्गावर बस सोडण्यात येतील. शिवाय लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यांत वाढ केली जाणार आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली. पुढील आठवड्यात तालुक्याच्या पश्चिम, पूर्व भागात बसफेऱ्यांत वाढ करण्यात येणार आहे. ##@@ ##@@ गळक्या बस दुरुस्तीची मागणी : प्रवाशांना सेवा देण्यासाठी जादा बस धावत असतात. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गळक्या बसची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
डिझेलच्या खर्चात कपात करण्यासाठी बेळगाव, धारवाड व हुबळी आगाराला मिळून नवीन 350 इलेक्ट्रिक बस देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी बेळगाव आगारला 50 इलेक्ट्रिक बस मिळणार होत्या. मात्र त्या बसचे पुढे काय झाले समजू शकले नाही. निवडणूक काळात आचारसंहितेमुळे कार्यवाही थांबली असली तरी आता ती अडचणदेखील दूर झाली आहे. त्यामुळे 50 इलेक्ट्रिक बस बेळगाव आगाराला द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
50 Electric Bus Belgaum
50 Electric Bus Belgaum
50 Electric Bus Belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements